मराठी (Marathi): translationNotes Print

Updated ? hours ago # views See on WACS

2 पेत्र याचा परिचय

भाग 1: सामान्य परिचय

2 पेत्र या पुस्तकाची रूपरेषा

  1. परिचय (1:1-2)
  2. परिचय (1:1-2)
  3. चांगले जीवन जगण्याची आठवण करून दिली कारण देवाने त्यासाठी आपल्याला सक्षम केले आहे (1:3-21)
  4. येशूच्या दुसऱ्या आगमनासाठी तयार राहण्यासाठी प्रोत्साहन (3:1-17)

2 पेत्र हे पुस्तक कोणी लिहिले?

लेखक स्वतःची ओळख शिमोन पेत्र अशी करून देतो. शिमोन पेत्र हा प्रेषित होता. त्याने 1 पेत्र हे पुस्तक सुद्धा लिहिले. कदाचित पेत्राने हे पत्र तुरुंगात असताना त्याच्या मरण्याच्या थोडे अगोदर लिहिले असावे. पेत्र या पत्राला दुसरे पत्र म्हणतो म्हणून याची तारीख आपण पहिल्या पत्रानंतरची समजू शकतो. त्याने हे पत्र त्याच श्रोत्यांना संबोधित करण्यासाठी लिहिले जे पहिल्या पत्राचे श्रोते होते. हे श्रोते कदाचित आशिया मायनरमध्ये विखुरलेले ख्रिस्ती लोक असावेत.

2 पेत्र हे पुस्तक कश्याबद्दल आहे?

पेत्राने हे पत्र विश्वासणाऱ्यांना चांगले जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी लिहिले. त्याने श्रोत्यांना खोट्या संदेष्ट्यांबद्दल जे म्हणतात की येशूला परत येण्यासाठी खूप वेळ लागणार आहे त्याबद्दल चेतावणी दिली. त्याने त्यांना सांगितले की येशू परत येण्यामध्ये आवकाश नाही. त्याऐवजी, देव त्यांना पश्चात्ताप करण्याची संधी देत आहे जेणेकरून ते वाचले जातील.

या पुस्तकाच्या शीर्षकाचे भाषांतर कसे केले जाऊ शकते?

भाषांतरकार या पुस्तकाचे भाषांतर त्याच्या पारंपारिक शीर्षकाने “2 पेत्र” किंवा “दुसरे पेत्र” याने करू शकतात. किंवा ते स्पष्ट शीर्षकाची निवड करू शकतात, जसे की “पेत्राचे दुसरे पत्र” किंवा “पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र.” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#translate-names)

भाग 2: महत्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पना

पेत्र ज्यांच्याविरुद्ध बोलला ते लोक कोण होते?

ज्या लोकांच्या विरुद्ध पेत्र बोलला ते कदाचित अज्ञातवासी म्हणून ओळखले गेले असावे. या शिक्षकांनी स्वतःच्या फायद्यासाठी वचनांच्या शिक्षणाला विकृत केले. ते अनैतिक मार्गाने जगले आणि त्यांनी इतरांना सुद्धा तसेच जगायला शिकवले.

देव प्रेरित वचन याचा अर्थ काय?

वचनांचे तत्व हे खूप महत्वाचे आहे. 2 पेत्र वाचकांना हे समजण्यासाठी मदत करते की जरी प्रत्येक वचन लिहिणाऱ्या लेखकाची स्वतःची वेगळी पद्धत असते, तरी देव हा वचनाचा खरा लेखक आहे (1:20-21).

भाग 3: भाषांतराच्या महत्वाच्या समस्या

एकवचनी आणि अनेकवचनी “तु”

या पुस्तकात “मी” हा शब्द पेत्राला संदर्भित करतो. आणि “तुम्ही” हा शब्द नेहमी अनेकवचनी आहे आणि तो पेत्राच्या श्रोत्यांना संदर्भित करतो. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-exclusive आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-you)

2 पेत्राच्या पुस्तकाच्या मजकुरांमध्ये महत्वाच्या कोणत्या समस्या आहेत?

खालील काही वचनांसाठी, पवित्रशास्त्राच्या काही नवीन आवृत्त्या जुन्या आवृत्त्यांपेक्षा वेगळ्या आहेत. युएलटी मजकुरामध्ये आधुनिक वाचन आहे आणि जुने वाचन तळटीप मध्ये ठेवलेले आहे. पवित्र शास्त्राचे भाषांतर सामान्य क्षेत्रामध्ये अस्तित्वात असेल तर भाषांतरकारांनी त्या आवृत्त्यांमध्ये मिळणाऱ्या वाचनाचा विचार करावा. जर नसेल तर भाषांतरकारांनी आधुनिक वाचनाचे अनुसरण करण्याचे सुचवले जाते.

  • “न्याय होईपर्यंत खाली अंधारात कैदेत ठेवले” (2:4). काही नवीन आवृत्त्यांमध्ये आणि जुन्या आवृत्त्यांमध्ये “न्याय होईपर्यंत डोहाच्या खालील अंधारामध्ये ठेवले” असे आहे.
  • “ते तुमच्याबरोबर सण साजरे करत असताना त्याची कपटाची कृत्ये उपभोगतात” (2:13). काही आवृत्त्यांमध्ये “तुमच्याबरोबर प्रेमाच्या सणातील सण साजरे करत असताना ते त्यांच्या कृत्यांचा उपभोग घेतात” असे आहे.
  • “बौर” (2:15). काही इतर आवृत्त्या “बोसोर” असे वाचतात.
  • “सृष्टीतत्वे अग्नीद्वारे जाळली जातील आणि पृथ्वी आणि तिच्यातील कृत्ये प्रगट होतील” (3:10).इतर आवृत्त्यांमध्ये “सृष्टीतत्वे अग्नीद्वारे जाळली जातील आणि पृथ्वी आणि तिच्यावरील कृत्ये सुद्धा जाळली जातील” असे आहे.

(पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#translate-textvariants)

2 Peter 1

2 पेत्र 01 सामान्य माहिती

स्वरूप आणि संरचना

1-2 वचनात पेत्र औपचारिकरित्या या पत्राची ओळख करून देतो. पूर्वेकडील भागात प्राचीन काळी लेखक बऱ्याचदा पत्राची सुरवात या प्रकारे करत.

या अधिकारातील विशेष संकल्पना

देवाचे ज्ञान

देवाचे ज्ञान असणे म्हणजे त्याचे असणे किंवा त्याच्याबरोबर संबंध असणे. येथे “ज्ञान” हे मानसिकदृष्ट्या देव माहित असणे याच्यापेक्षा काहीतरी जसे आहे. हे ते ज्ञान आहे जे देवाला एखाद्या मनुष्याला वाचवावयास भाग पाडते आणि त्याला दया आणि शांती देते. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tw/other.html#know)

दैवी जीवन जगणे

पेत्र शिकवतो की देवाने विश्वासणाऱ्यांना दैवी जीवन जगण्यासाठी ज्या कशाची गरज आहे ते सर्व दिले आहे. म्हणून, विश्वासणाऱ्यांनी देवाची आज्ञा अधिकाधिक पाळण्यासाठी ते करू शकतील ते सर्व काही केले पाहिजे. जर विश्वासणारे हे करत राहतील, तर ते त्यांच्या येशुबरोबर असलेल्या संबंधाद्वारे परिणामकारक आणि उत्पादक बनू शकतात. तथापि, जर विश्वासणारे दैवी जीवन जगत राहिले नाहीत तर, देवाने त्यांना वाचवण्यासाठी ख्रिस्ताद्वारे जे काही केले ते विश्वासणारे विसरले असे होईल. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tw/kt.html#godly आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tw/kt.html#save)

या अधिकारातील भाषांतराच्या इतर शक्य अडचणी

वचनाचे सत्य

पेत्र शिकवतो की या वचनात केलेल्या भविष्यवाण्या या मनुष्यांद्वारे केलेल्या नाहीत. पवित्र आत्म्याने देवाचे संदेश मनुष्यांवर प्रगट केले जे ते बोलले किंवा त्यांनी लिहून काढले. अजून, पेत्र आणि इतर प्रेषित लोकांना येशुबद्दल जे काही सांगतात त्या कथा त्यांनी बनवलेल्या नाहीत. येशूने जे काही केले ते त्याचे साक्षीदार आहेत आणि देवाने येशूला त्याचा पुत्र म्हणल्याचे त्यांनी ऐकले आहे.

2 Peter 1:1

General Information:

पेत्र स्वतःची ओळख लेखक म्हणून करून देतो आणि ज्या विश्वासणाऱ्यांना तो लिहितो त्यांना ओळखतो आणि त्यांचे स्वागत करतो.

slave and apostle of Jesus Christ

पेत्र येशू ख्रिस्ताचा सेवक असल्याचे बोलतो. त्याला ख्रिस्ताचा प्रेषित होण्याचे पद आणि अधिकार सुद्धा दिला होता.

to those who have received the same precious faith

या लोकांनी विश्वास प्राप्त केला हे याला सूचित करते की, देवाने तो विश्वास त्यांना दिला. पर्यायी भाषांतर: “त्यांना ज्यांना देवाने तसाच पूर्ण विश्वास दिला” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-explicit)

to those who have received

ज्यांनी प्राप्त केले आहे त्या तुम्हाला. पेत्र सर्व विश्वासणाऱ्यांना जे हे पत्र वाचतील त्यांना संबोधित करत आहे.

we have received

येथे “आम्ही” या शब्दाचा संदर्भ पेत्र आणि इतर प्रेषितांशी येतो, परंतु ज्यांना तो लिहित आहे त्यांच्याशी येत नाही. पर्यायी भाषांतर: आम्ही प्रेषितांनी प्राप्त केले” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-exclusive)

2 Peter 1:2

May grace and peace increase in measure

देव एकमेव आहे जो विश्वासणाऱ्यांना दया आणि शांती देतो. पर्यायी भाषांतर: “देव तुमच्यावर दया आणि शांती करत राहो” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-explicit)

May grace and peace increase

पेत्र शांतीबद्दल बोलत आहे जसे ती एक वस्तू आहे जिला तिच्या आकारमानात किंवा संख्येत वाढऊ शकतो. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

in the knowledge of God and of Jesus our Lord

तुम्ही “ज्ञान” याचे भाषांतर मौखिक वाक्यांशासह करू शकता. पर्यायी भाषांतर: “तुम्ही देव आणि येशू आमचा प्रभू याला ओळखण्याद्वारे” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-abstractnouns)

2 Peter 1:3

General Information:

पेत्र विश्वासणाऱ्यांना देवभक्तीचे जीवन जगण्याबद्दल शिकवण्यास सुरवात करतो.

for life and godliness

येथे “देवभक्ती” हे “जीवन” या शब्दाचे वर्णन करते. पर्यायी भाषांतर: “देवभक्तीच्या जीवनासाठी” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-hendiadys)

who called us

येथे “आम्हाला” हा शब्द पेत्र आणि त्याच्या श्रोत्यांना संदर्भित करतो. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-inclusive)

2 Peter 1:4

Through these

येथे “हे” याचा संदर्भ “त्याचे स्वःताचे वैभव आणि चारित्र्य” याच्याशी येतो.

you might be sharers

तुम्ही कदाचित विभागूण घ्यावे

the divine nature

देव कशासारखा आहे

having escaped the corruption in the world that is caused by evil desires

पेत्र त्या लोकांनी भ्रष्टाचारानी ग्रस्त न होण्याबद्दल बोलतो जे दुष्ट इच्छांच्या कारणामुळे घडतात जसे की ते त्या भ्रष्टाचारांपासून सुटणे आहे. “भ्रष्टाचार” हा शब्द एक अमूर्त संज्ञा आहे जिला मौखिक वाक्यांशासह भाषांतरित केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जेणेकरून जगातील दुष्ट इच्छा तुम्हाला अजून भ्रष्ट करू शकणार नाहीत” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-abstractnouns)

2 Peter 1:5

For this reason

याचा संदर्भ पेत्राने या आधीच्या वचनात काय सांगितले त्याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “कारण देवाने जे काही केले आहे त्यामुळे” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-explicit)

2 Peter 1:7

brotherly affection

याचा संदर्भ मित्र किंवा कुटुंबातील सदस्यासाठी असणाऱ्या प्रेमाशी येतो आणि त्याचा अर्थ आत्मिक कुटुंबातील सदस्यासाठीचे प्रेम असा सुद्धा होतो.

2 Peter 1:8

these things

याचा संदर्भ विश्वास, चारित्र्य, ज्ञान, आत्म नियंत्रण, सहनशीलता, देवभक्ती, बंधुप्रिती, आणि प्रेम, ज्यांचा उल्लेख पेत्राने आधीच्या वचनात केला त्याच्याशी येतो.

you will not be barren or unfruitful

पेत्र अशा व्यक्तीबद्दल बोलतो ज्याच्याकडे हे गुण नाहीत जसे की तो त्या शेतासारखा आहे जे पीक उत्पन्न करीत नाही. हे कर्तरी सज्ञांमध्ये सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “तुम्ही उत्पन्न कराल आणि फलद्रूप व्हाल” किंवा “तुम्ही परिणामकारक असाल” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-doublenegatives)

barren or unfruitful

या शब्दांचा मूळ अर्थ हा एकच गोष्ट होतो आणि हा मनुष्य उत्पादक नसेल किंवा येशूला ओळखल्यामुळे कोणत्याही फायद्याचा अनुभव न घेणारा यावर भर देतो. पर्यायी भाषांतर: “उत्पादनक्षम नसलेला” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-doublet)

in the knowledge of our Lord Jesus Christ

तुम्ही “ज्ञान” याचे भाषांतर मौखिक वाक्यांशासह करू शकता. पर्यायी भाषांतर: “तुम्ही देव आणि येशू आमचा प्रभू याला ओळखण्याद्वारे” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-abstractnouns)

2 Peter 1:9

whoever lacks these things

कोणताही व्यक्ती ज्याच्याकडे या गोष्टी नाहीत

is so nearsighted that he is blind

पेत्र अशा व्यक्तीबद्दल बोलतो ज्याच्याकडे हे गुण नाहीत जसे की तो दूरदृष्टी नसलेला किंवा आंधळा आहे कारण त्याला त्याची किंमत कळत नाही. पर्यायी भाषांतर: एक दूरदृष्टी नसलेल्या व्यक्तीप्रमाणे आहे जो त्याचे महत्व पाहू शकत नाही” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

he has been cleansed from his past sins

तुम्ही याचे भाषांतर करण्याकरिता क्रियापदाचा उपयोग करू शकता. पर्यायी भाषांतर: “की देवाने त्याला त्याच्या जुन्या पापापासून शुद्ध केले आहे” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-abstractnouns)

2 Peter 1:10

make your calling and election sure

“बोलवणे” आणि “निवडणे” या शब्दांचा अर्थ सामायिक आहे आणि त्याचा संदर्भ देवाने त्यांना त्याचे लोक होण्याकरिता निवडले असा होतो. पर्यायी भाषांतर: “देवाने खरोखर तुम्हाला त्याचे होण्याकरिता निवडले आहे याची खात्री करा” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-doublet)

you will not stumble

येथे “अडखळणे” या शब्दाचा संदर्भ एकतर 1) पाप करणे. पर्यायी भाषांतर: “तुम्ही पापी स्वभावामध्ये राहणार नाही” किंवा 2) ख्रिस्ताशी अविश्वासी बनणे. पर्यायी भाषांतर: “तुम्ही ख्रिस्ताशी अविश्वासू बनणार नाही” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

2 Peter 1:11

there will be richly provided for you an entrance into the eternal kingdom

हे सकारात्मक स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव सार्वकालिक राज्यात प्रवेश करण्यासाठी तुम्हास विपुलतेने पुरवील” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

an entrance

प्रवेश करण्याची संधी

2 Peter 1:12

Connecting Statement:

पेत्र विश्वासणाऱ्यांना सतत आठवण करून देतो आणि त्यांना शिकवणे याबद्दलच्या त्याच्या कर्तव्याबद्दल सांगतो.

you are strong in the truth

या गोष्टींच्या सत्याबद्दल तुम्ही ठामपणे विश्वास ठेवता.

2 Peter 1:13

to stir you up by way of reminder

येथे “हलवणे” या शब्दाचा अर्थ एखाद्याला झोपेतून उठवणे असा होतो. पेत्र त्याच्या वाचकांना या गोष्टींबद्दल विचार करण्यास भाग पाडतो जसे की तो त्यांना झोपेतून उठवत आहे. पर्यायी भाषांतर: “तुम्हाला या गोष्टींबद्दल आठवण करून देतो जेणेकरून तुम्ही त्यांच्याबद्दल विचार कराल” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

as long as I am in this tent

पेत्र त्याच्या शरीराबद्दल बोलतो जसे की ते एक तंबू आहे ज्याला त्याने रोवला आहे आणि तो ते काढून टाकेल. त्याच्या शरीरात असणे हे तो जिवंत असण्याचे प्रतिक आहे, आणि ते काढून टाकणे हे मरण्याचे प्रतिक आहे. पर्यायी भाषांतर: “जोपर्यंत मी या शरीरात आहे” किंवा “जोपर्यंत मी जिवंत आहे” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-euphemism)

2 Peter 1:14

the putting off of my tent will be soon

पेत्र त्याच्या शरीराबद्दल बोलतो जसे की ते एक तंबू आहे ज्याला त्याने रोवला आहे आणि तो ते काढून टाकेल. त्याच्या शरीरात असणे हे तो जिवंत असण्याचे प्रतिक आहे, आणि ते काढून टाकणे हे मरण्याचे प्रतिक आहे. पर्यायी भाषांतर: “मी लवकरच हे शरीर काढून टाकेल” किंवा “मी लवकरच मरणार आहे” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-euphemism)

2 Peter 1:15

you may be always able to remember these things

येथे “या गोष्टी” यांचा संदर्भ आधीच्या वचनात पेत्राने जे काही सांगितले त्या सर्वांशी येतो.

after my departure

पेत्र त्याच्या मृत्यूबद्दल बोलतो जसे की तो दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एखादे ठिकाण सोडत आहे. पर्यायी भाषांतर: “माझ्या मृत्यूनंतर” किंवा “मी मेल्यानंतर” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-euphemism)

2 Peter 1:16

Connecting Statement:

पेत्र त्याचे शिक्षण विश्वासणाऱ्यांना स्पष्ट करून सांगत राहतो आणि ते विश्वासयोग्य का आहे ते सुद्धा स्पष्ट करत राहतो.

For we did not follow cleverly invented myths

येथे “आम्ही” हा शब्द पेत्र आणि इतर प्रेषितांना संदर्भित करतो, परंतु त्याच्या वाचकांना संदर्भित करता नाही. पर्यायी भाषांतर: “कारण आम्ही प्रेषित चतुराईने बनवलेल्या कथांचे अनुसरण करीत नाही” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-exclusive)

the power and the coming

हे दोन वाक्यांश कदाचित एकाच गोष्टीला संदर्भित करतात आणि त्यांचे भाषांतर एकच वाक्यांश असे केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “सामर्थ्यवान येत आहे” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-hendiadys)

the coming of our Lord Jesus Christ

शक्य अर्थ हे आहेत 1) प्रभू येशूचे भविष्यातील येणे किंवा 2) प्रभू येशूचे पहिले येणे.

our Lord Jesus Christ

येथे “आमचा” हा शब्द सर्व विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतो. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-inclusive)

2 Peter 1:17

when a voice was brought to him by the Majestic Glory

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जेंव्हा त्याने भव्य वैभवातून आलेला आवाज ऐकला” किंवा “जेंव्हा त्याने भव्य वैभवातून येणारा आवाज त्याच्याशी बोलताना ऐकला” किंवा “जेंव्हा भव्य वैभव त्याच्याशी बोलले” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

the Majestic Glory saying

पेत्र देवाला त्याच्या वैभवाच्या संज्ञेत संदर्भित करतो. हे एक शोभनभाषित आहे जे देवाचे नाव घेणे त्याच्याबद्दल असणाऱ्या आदरामुळे टाळते. पर्यायी भाषांतर: “देव, सर्वोच्च वैभव, म्हणतो” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metonymy आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-euphemism)

2 Peter 1:18

We ourselves heard this voice brought from heaven

“आम्ही,” या शब्दासह पेत्र त्याला आणि याकोब आणि योहान या शिष्यांना संदर्भित करत आहे, ज्यांनी देवाचा आवाज ऐकला. पर्यायी भाषांतर: “आम्ही स्वतः स्वर्गातून आलेला आवाज ऐकला आहे” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-exclusive)

heard this voice brought from heaven

अशा एकाचा आवाज ऐकला जो स्वर्गातून बोलला

we were with him

आम्ही येशुबरोबर होतो

2 Peter 1:19

General Information:

पेत्र विश्वासणाऱ्यांना खोट्या शिक्षकांबद्दल चेतावणी देण्यास सुरवात करतो.

For we have this prophetic word made more sure

ज्या गोष्टी पेत्र आणि इतर प्रेषितांनी पहिल्या, ज्याचे वर्णन त्याने आधीच्या वचनात केले, त्या गोष्टी संदेष्टये जे काही बोलले त्याची खात्री करतात. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कारण ज्या गोष्टी आम्ही बघितल्या त्याने या भविष्यवाणीचा संदेश अधिक निश्चित करतो” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-explicit आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

For we have

येथे “आपण” या शब्दाचा संदर्भ सर्व विश्वासणाऱ्यांशी येतो, ज्यामध्ये पेत्र आणि त्याचे वाचक समाविष्ट आहेत. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-inclusive)

this prophetic word made

याचा संदर्भ जुन्या कराराशी येतो. पर्यायी भाषांतर: “वचने, जी संदेष्टये बोलले, बनवले” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-explicit)

you do well to pay attention to it

पेत्र विश्वासणाऱ्यांना भविष्यवाणीच्या संदेशाकडे अधिक लक्ष देण्याची सूचना करतो.

as to a lamp shining in a dark place, until the day dawns

पेत्र भविष्यवाणीच्या शब्दाची तुलना दिव्याबरोबर करतो जो अंधारात सकाळचा उजेड येईपर्यंत प्रकाश देतो. सकाळ होणे हे ख्रिस्ताच्या येण्याला संदर्भित करते. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-simile)

the morning star rises in your hearts

पेत्र ख्रिस्ताबद्दल जसे की तो “प्रभातेचा तारा” आहे असे बोलतो, जो दिवसाच्या सुरवातीला आणि अंधाराच्या शेवटाला सूचित करतो. ख्रिस्त सर्व विश्वासणाऱ्यांच्या हृदयात त्यांच्या सर्व संशयाचा शेवट करून आणि तो कोण आहे याबद्दल पूर्ण समज आणून प्रकाश आणेल. येथे “हृदय” हे लोकांच्या विचारांबद्दल रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “ख्रिस्त त्याचा प्रकाश तुमच्या हृदयावर पाडेल जसा प्रभातेचा तारा त्याचा प्रकाश जगात पाडतो” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metonymy)

the morning star

“प्रभातेचा तारा” याचा संदर्भ शुक्र ग्रहाशी येतो, जो कधीकधी सूर्य उगवायच्या आधी उगवतो आणि पाहाट होत आहे हे सूचित करतो.

2 Peter 1:20

Above all, you must understand

अतिशय महत्वाचे, तुम्हाला हे समजलेच पाहिजे

no prophecy comes from someone's own interpretation

शक्य अर्थ हे आहेत 1) संदेष्टये त्यांच्या भविष्यवाण्या स्वतः करत नाहीत किंवा 2) लोकांनी भविष्यवाणी समजण्यासाठी पवित्र आत्म्यावर अवलंबून राहिले पाहिजे किंवा 3) लोकांनी भविष्यवाणींचा अर्थ विश्वासणाऱ्यांच्या संपूर्ण ख्रिस्ती लोकांच्या मदतीने लावला पाहिजे.

2 Peter 1:21

men spoke from God when they were carried along by the Holy Spirit

पेत्र पवित्र आत्मा संदेष्ट्यांना देवाची त्यांनी जे लिहावे अशी इच्छा आहे ते लिहिण्यास मदत करतो याबद्दल बोलतो जसे की पवित्र आत्मा त्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेतो. पर्यायी भाषांतर: “जसे पवित्र आत्म्याने त्यांना निर्देश दिले तसे ते लोक देवाकडून बोलले” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

2 Peter 2

2 पेत्र 02 सामान्य माहिती

या अधिकारातील विशेष संकल्पना

देह

“देह” हे मनुष्याच्या पापी स्वभावासाठीचे रूपक आहे. हा मनुष्याच्या शरीराचा भाग नाही जो की पापमय आहे. “देह” हा मनुष्याच्या स्वभावाला प्रदर्शीत करतो जो देवाच्या गोष्टी नाकारतो आणि जे पापमय आहे त्याची इच्छा करतो. अशी स्थिती सर्व मनुष्यांची त्यांनी येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे पवित्र आत्मा प्राप्त करण्यापूर्वी होती. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tw/kt.html#flesh)

गूढ माहिती

2:4-8 मध्ये अनेक साम्य आहेत ज्यांना समजणे अवघड आहे जर जुन्या कराराचे भाषांतर झालेले नसेल. कदाचित अधिक स्पष्टीकरण आवश्यक असेल. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-explicit)

2 Peter 2:1

General Information:

पेत्र विश्वासणाऱ्यांना खोट्या शिक्षकांबद्दल चेतावणी देण्यास सुरवात करतो.

False prophets came to the people, and false teachers will also come to you

जसे खोटे शिक्षक इस्राएलला फसवण्यासाठी आले होते, तसेच खोटे शिक्षक ख्रिस्ताबद्दल खोटे शिकवण्यासाठी येतील.

destructive heresies

“पाखंडी मत” या शब्दाचा संदर्भ मत जे ख्रिस्ताचे शिक्षण आणि प्रेषितांच्या शिक्षणाच्या विरुद्ध आहे याच्याशी येतो. ही पाखंडी मते अशा लोकांच्या विश्वासाचा नाश करतात ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे.

the master who bought them

येथे “स्वामी” या शब्दाचा संदर्भ अशा व्यक्तीशी येतो ज्याचे स्वतःचे दास असतात. पेत्र येशूबद्दल लोकांचा मालक असे बोलतो ज्यांना त्याने त्याच्या मृत्यूची किंमत देऊन विकत घेतले आहे. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-explicit)

2 Peter 2:2

sensuality

अनैतिक लैंगिक स्वभाव

the way of truth will be blasphemed

“सत्याचा मार्ग” या वाक्यांशाचा संदर्भ ख्रिस्ती विश्वास एक देवाकडे जाण्याचा खरा मार्ग याच्याशी येतो. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “अविश्वासणारे सत्याच्या मार्गाची निंदा करतील” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

2 Peter 2:3

exploit you with deceptive words

तुम्ही त्यांना पैसे देण्यासाठी तुम्हाला ते खोटे बोलून तयार करतील

their condemnation has not been idle, and their destruction is not asleep

पेत्र “निषेध” आणि “विनाश” यांच्याबद्दल बोलतो जसे की ते मनुष्य आहेत जे कृती करतात. दोन वाक्यांश मूळतः एकच गोष्ट आहे आणि ते किती लवकर खोट्या शिक्षकांचा निषेध केला जाईल यावर भर देतात. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-personification आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-parallelism)

their condemnation has not been idle, and their destruction is not asleep

तुम्ही या वाक्यांशाचे भाषांतर क्रियापदासह सकारात्मक सज्ञांमध्ये करू शकता. पर्यायी भाषांतर: “देव लवकरच त्यांचा निषेध करील; तो त्यांचा नाश करण्यासाठी तयार आहे” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-doublenegatives)

2 Peter 2:4

Connecting Statement:

पेत्र अशा लोकांचे उदाहरण देतो ज्यांनी देवाच्या विरोधामध्ये कृती केली आणि त्यांनी जे काही केले त्याबद्दल ज्यांना देवाने शिक्षा केली.

did not spare

शिक्षा देण्यापासून परावृत्त झाला नाही किंवा “शिक्षा केली”

he handed them down to Tartarus

“तार्तारास” हा शब्द ग्रीक धर्मातील एक संज्ञा आहे जिचा संदर्भ अशी जागा जिथे दुष्ट आत्मे आणि दुष्ट माणसे जी मेलेली आहेत त्यांना शिक्षा केली जाते याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “त्याने त्यांना नरकात टाकले” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#translate-names)

to be kept in chains of lower darkness

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जेथे तो त्यांना भयंकर अंधारातील कैदेत ठेवेल” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

in chains of lower darkness

शक्य अर्थ हे आहेत 1) “अतिशय अंधाऱ्या जागेतील कैदेत” किंवा 2) अतिशय खोल अंधकार जे त्यांना कैदेत टाकल्यासारखे भासते.” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

until the judgment

याचा संदर्भ न्यायाच्या दिवसाशी येतो जेंव्हा देव प्रत्येक मनुष्याचा न्याय करेल.

2 Peter 2:5

he did not spare the ancient world

येथे “जग” या शब्दाचा संदर्भ त्यात राहणाऱ्या लोकांशी येतो. पर्यायी भाषांतर: “त्याने प्राचीनकाळी राहणाऱ्या लोकांना सोडले नाही” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metonymy)

he preserved Noah ... along with seven others

देवाने जेंव्हा प्राचीन जगातील लोकांचा नाश केला तेंव्हा नोहा आणि त्याच्याबरोबर असलेल्या सात लोकांचा नाश केला नाही.

2 Peter 2:6

reduced the cities of Sodom and Gomorrah to ashes

सदोम आणि गमोरा या शहरांना अग्नीने राख होईपर्यंत जाळून टाकले

condemned them to destruction

येथे “त्यांना” या शब्दाचा संदर्भ सदोम आणि गमोरा आणि त्यामध्ये राहणाऱ्या लोकांशी येतो.

as an example of what is to happen to the ungodly

जे लोक देवाची अवज्ञा करतील त्यांच्याबरोबर काय होईल याबद्दल सदोम आणि गमोरा यांनी एक उदाहरण आणि चेतावणी दिली.

2 Peter 2:7

Connecting Statement:

पेत्र लोटाचे उदाहरण देतो, ज्याला देवाने अशा लोकांच्यामधून सोडवले जे शिक्षेच्या योग्य होते.

the sensual behavior of lawless people

लोकांचा अनैतिक स्वभाव ज्याने देवाचे नियम मोडले

2 Peter 2:8

that righteous man

याचा संदर्भ लोटाशी येतो.

was tormented in his righteous soul

येथे “आत्मा” याचा संदर्भ लोटाचे विचार आणि भावना यांच्याशी येतो. सदोम आणि गमोरा शहरातील नागरिकांच्या अनैतिक वागणुकीने त्याला भावनिकदृष्ट्या त्रास दिला होता. पर्यायी भाषांतर: “अनेक पीडा होत होत्या” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-synecdoche)

2 Peter 2:10

Connecting Statement:

पेत्र पापी मनुष्यांच्या गुणधर्मांचे वर्णन करण्यास सुरवात करतो.

This is especially true

“हा” या शब्दाचा संदर्भ 2 पेत्र 2:9 मध्ये देवाने पापी मनुष्यांना न्यायाच्या दिवसापर्यंत कैदेत ठेवण्याशी येतो.

those who continue in the corrupt desires of the flesh

येथे “देहाच्या इच्छा” या वाक्यांशाचा संदर्भ पापी स्वभावाच्या इच्छा यांच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “असे जे त्यांच्या भ्रष्ट, पापी इच्छांना पूर्ण करत राहतात”

despise authority

देवाच्या अधिकाराला समर्पित होण्यास नकार देतात. येथे “अधिकार” या शब्दाचा संदर्भ कदाचित देवाचा अधिकार याच्याशी येतो.

authority

येथे “अधिकार” याचा अर्थ देव असा होतो, ज्याला आज्ञा देण्याचा आणि अवज्ञा करणाऱ्याला शिक्षा करण्याचा अधिकार आहे. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metonymy)

self-willed

त्यांची जे करण्याची इच्छा आहे ते करत

the glorious ones

या वाक्यांशाचा संदर्भ आत्मिक गोष्टींशी येतो, जसे की देवदूत किंवा सैतान.

2 Peter 2:11

greater strength and power

खोट्या शिक्षकांपेक्षा अधिक सामर्थ्य आणि ताकद

they do not bring insulting judgments against them

“ते” या शब्दाचा संदर्भ दुतांशी येतो. “त्यांना” या शब्दाचे शक्य अर्थ हे आहेत 1) वैभवशाली जन किंवा 2) खोटे शिक्षक.

bring insulting judgments against them

दूत त्यांना दोष देतील ही संकल्पना बोलली आहे जसे की ते त्यांच्यावर दोषारोपाला शस्त्र असे वापरून हल्ला करतील. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

2 Peter 2:12

these unreasoning animals are naturally made for capture and destruction.

ज्या प्रकारे प्राणी तर्क करू शकत नाहीत, तसेच या लोकांच्या बरोबर तर्क केला जाऊ शकत नाही. पर्यायी भाषांतर: “हे खोटे शिक्षक तर्कहीन प्राण्यांसारखे आहेत ज्यांना बंदी बनवून त्यांचा नाश केला जाईल” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

They do not know what they insult

त्यांना जे माहित नाही किंवा समजत नाही त्याबद्दल ते वाईट बोलतात.

They will be destroyed

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव त्यांचा नाश करील” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

2 Peter 2:13

They will receive the reward of their wrongdoing

पेत्र शिक्षेबद्दल बोलतो जिला खोटे शिक्षक प्राप्त करतील जसे की तो एक पुरस्कार आहे. पर्यायी भाषांतर: “त्यांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींबद्दल ज्यासाठी ते पात्र आहेत ते त्यांना मिळेल” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-irony)

luxury during the day

“ऐष आराम” या शब्दाचा संदर्भ अनैतिक कृत्यांशी येतो ज्यामध्ये खादाडपण, दारूबाजी, आणि लैंगिक कृत्यांचा समावेश होतो. या गोष्टी दिवसा करणे हे याला सूचित करते की या लोकांना या वागणुकीची लाज वाटत नाही.

They are stains and blemishes

“डाग” आणि “ठिपके” हे शब्द सारखाच अर्थ सांगतात. पेत्र खोट्या शिक्षकांबद्दल बोलतो जसे की ते कपड्यांवर पडलेले डाग आहेत, जो त्या कपड्यांना घालतो त्याला लाज आणतात. पर्यायी भाषांतर: “ते कपड्यांवर पडलेल्या डाग आणि ठिपक्यांसारखे आहेत, जे मानहानी करतात” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-doublet)

2 Peter 2:14

They have eyes full of adultery

येथे “डोळे” त्यांच्या इच्छांचे प्रतिनिधित्व करतात आणि “डोळे भरून” याचा अर्थ त्यांना नेहमी काहीतरी हवे असते असा होतो. पर्यायी भाषांतर: “त्यांना नेहमी व्यभिचार करायचा असतो” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metonymy)

they are never satisfied with sin

जरी त्यांनी त्याची वासना पूर्ण करण्यासाठी पाप केले, तरी जे पाप ते करतात ते कधीही तृप्त होत नाही.

They entice unstable souls

येथे “आत्मा” या शब्दाचा संदर्भ व्यक्तींशी येतो. पर्यायी भाषांतर: “ते अस्थिर लोकांना भुरळ घालतात” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-synecdoche)

hearts trained in covetousness

येथे “हृदय” या शब्दाचा संदर्भ मनुष्याचे विचार आणि भावना याच्याशी येतो. त्यांच्या सवयींच्या कार्यामुळे, त्यांनी स्वतःला लोभ टाळण्यासाठी आणि कार्य करण्यास प्रशिक्षित केले आहे. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metonymy)

2 Peter 2:15

They have abandoned the right way and have wandered off to follow

या खोट्या शिक्षकांनी योग्य मार्ग सोडला आहे, आणि अनुसरण करण्यासाठी ते भलतीकडे गेले आहेत. खोट्या शिक्षकांनी देवाची आज्ञा पाळण्यास नकार दिला आहे कारण त्यांनी जे योग्य आहे ते नाकारले आहे.

the right way

योग्य वर्तणूक जी देवाचा सन्मान करते याबद्दल बोलले आहे जसे की तो एक अनुसरण करण्याचा मार्ग आहे. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

2 Peter 2:16

he obtained a rebuke

तुम्ही निर्देशित करू शकता की तो देव होता ज्याने बलामाला दोष दिला. पर्यायी भाषांतर: देवाने त्याला दोष दिला” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-abstractnouns)

a mute donkey speaking in a human voice

एक गाढव, जे स्वभावतः बोलू शकत नाही, ते मानवी आवाजात बोलले.

stopped the prophet's insanity

देवाने संदेष्ट्याच्या मूर्खपणाच्या कृतीला थांबवण्यासाठी गाढवाचा वापर केला. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metonymy)

2 Peter 2:17

These men are springs without water

पाण्याने वाहणारे झरे हे तहानलेल्या लोकांसाठी ताजे करण्याचे वचन आहेत, परंतु “पाण्याविना वाहणारे झरे” हे तहानलेल्या लोकांना निराश करून सोडते. त्याच प्रकारे, खोटे संदेष्ट्ये आहेत, जरी त्यांनी अनेक गोष्टींचे वचन दिले, तरी ज्याचे वचन त्यांनी दिले आहे ते करण्यात असमर्थ आहेत. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

mists driven by a storm

जेंव्हा लोक वादळी ढग पाहतात, तेंव्हा ते पाऊस पडण्याची अपेक्षा करतात. जेंव्हा वादळातील हवा ढगांना पाऊस पडण्याच्या आधी दूर घेऊन जाते, तेंव्हा लोक निराश होतात. त्याच प्रकारे, खोटे संदेष्ट्ये आहेत, जरी त्यांनी अनेक गोष्टींचे वचन दिले, तरी ज्यांचे वचन त्यांनी दिले आहे ते करण्यात असमर्थ आहेत. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

The gloom of thick darkness is reserved for them

“त्यांना” हा शब्द खोट्या संदेष्ट्यांना संदर्भित करतो. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने त्यांच्यासाठी गडद अंधकाराचा अंधार राखून ठेवला आहे” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

2 Peter 2:18

They speak with vain arrogance

ते प्रभावी परंतु अर्थहीन शब्दांचा वापर करतात.

They entice people through the lusts of the flesh

ते लोकांना अनैतिक आणि पापी कृत्यांमध्ये अडकवून ठेवण्यासाठी पापी स्वभावाचे आवाहन करतात.

people who try to escape from those who live in error

हा वाक्यांश अशा लोकांना संदर्भित करतो जे अलीकडेच विश्वासणारे बनले आहेत. “जे लोक चुका करत राहतात,” या वाक्यांशाचा संदर्भ अविश्वासणारे जे अजूनसुद्धा पापात आहेत त्यांच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “जे लोक जसे बाकीचे लोक पापात जीवन जगत होते तसे आधीचे जीवन जगण्याऐवजी धार्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करतात” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-explicit)

people who try to escape

पेत्र अशा लोकांच्याबद्दल बोलतो जे पाप करत राहतात जसे की ते पापाचे गुलाम आहेत ज्यांना गुलामीतून सोडवण्याची गरज आहे. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

2 Peter 2:19

They promise freedom to them, but they themselves are slaves of corruption

येथे स्वतंत्रता हा स्वतःला जसे हवे तसे जगण्याची क्षमता यासाठीचा शब्दबंध आहे. पर्यायी भाषांतर: “ते त्यांना तसेच जीवन जगण्याची क्षमता देण्याचे वचन देतात जसे त्यांची इछा आहे, परंतु ते स्वतः त्यांच्या पापी इच्छांमधून सुटलेले नाहीत” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

promise freedom ... slaves of corruption

पेत्र अशा लोकांच्याबद्दल बोलतो जे पाप करत राहतात जसे की ते पापाचे गुलाम आहेत ज्यांना गुलामीतून सोडवण्याची गरज आहे. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

For a man is a slave to whatever overcomes him

पेत्र एका व्यक्तीला गुलाम असे बोलतो जेंव्हा त्या व्यक्तीवर दुसऱ्या गोष्टीचे नियंत्रण असते, आणि ती गोष्ट त्या व्यक्तीची स्वामी अशी असते. पर्यायी भाषांतर: “कारण, जर कोणाचे एखाद्या व्यक्तीवर नियंत्रण असेल तर ती व्यक्ती त्याच्यासाठी एक गुलाम अशी बनून जाते” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

2 Peter 2:20

Connecting Statement:

“ते” आणि “त्यांना” या शब्दांचा संदर्भ खोट्या शिक्षकांशी येतो ज्यांच्याबद्दल पेत्र 12-19 या वचनात बोलतो.

If they have escaped ... and are again entangled ... and overcome, the last state has become worse ... than the first

हे वाक्य एका सशर्त विधानाचे वर्णन आहे जे सत्य आहे. खोटे शिक्षक एके वेळी “सुटू” शकतात, परंतु जर ते परत त्यामध्ये गुंतले ... आणि पराभूत झाले, तर “शेवटची अवस्था ही ... अगोदरच्या अवस्थेपेक्षा वाईट होईल.”

the corruption of the world

“भ्रष्ट” या शब्दाचा संदर्भ पापी स्वभाव जो एखाद्याला नैतिकदृष्ट्या अशुद्ध बनवतो. “जग” याचा संदर्भ मानवी समुदायाशी येतो. पर्यायी भाषांतर: “पापी मानवी समुदायातील भ्रष्ट सवयी” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metonymy)

through the knowledge of the Lord and Savior Jesus Christ

तुम्ही “ज्ञान” याचे भाषांतर मौखिक वाक्यांश वापरून करू शकता. तुम्ही यासारख्या वाक्यांशाचे भाषांतर 2 पेत्र 1:2 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त याला जानण्याद्वारे” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-abstractnouns)

the last state has become worse for them than the first

त्यांची स्थिती पहिल्यापेक्षा अधिक वाईट आहे

2 Peter 2:21

the way of righteousness

पेत्र जीवनाला “मार्ग” किंवा रस्ता असे बोलतो. या वाक्यांशाचा संदर्भ देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्याशी येतो. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

turn away from the holy commandment

येथे “च्या पासून वळा” हे एखादी गोष्ट करण्याचे थांबवा यासाठीचे रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “पवित्र आज्ञा पाळावयाच्या थांबवा” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

the holy commandment delivered to them

हे कर्तरी साज्ञांमध्ये सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने त्यांना दिलेल्या पवित्र आज्ञा” किंवा “पवित्र आज्ञा ज्याबद्दल देवाने हे निश्चित केले की त्या त्यांना प्राप्त होतील” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

2 Peter 2:22

This proverb is true for them

हे नितीसुत्र त्यांना लागू होते किंवा “हे नितीसुत्र त्यांचे वर्णन करते”

A dog returns to its own vomit, and a washed pig returns to the mud

पेत्र खोटे शिक्षक कसे आहेत याचे उदाहरण देण्यासाठी दोन नितीसुत्रांचा वापर करतो, जरी त्यांना “धर्मिकांचा मार्ग” माहित असला तरी ते त्याच्यापासून अशा गोष्टींकडे वळले आहेत ज्या त्यांना नैतिकदृष्ट्या आणि आत्मिकदृष्ट्या अशुद्ध करतात. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#writing-proverbs)

2 Peter 3

2 पेत्र 03 सामान्य माहिती

या अधिकारातील विशेष संकल्पना

आग

लोक बऱ्याचदा आगीचा वापर गोष्टींना नष्ट करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट त्यातील कचरा आणि निरुपयोगी घटक नष्ट करून शुद्ध करण्यासाठी करतात. म्हणून जेंव्हा देव दुष्टाला शिक्षा करतो किंवा त्याच्या लोकांना शुद्ध करतो तेंव्हा सहसा ते आगीशी संबंधित असते. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tw/other.html#fire)

प्रभूचा दिवस

देव येण्याच्या दिवसाची अचूक वेळ हि लोकांच्यासाठी एक अनपेक्षित गोष्ट असेल. “जसा रात्रीचा चोर येतो तसा” ही एक उपमा आहे. या कारणामुळे ख्रिस्ती लोकांनी प्रभूच्या आगमनासाठी तयार असले पाहिजे. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tw/kt.html#dayofthelord आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-simile)

2 Peter 3:1

General Information:

पेत्र शेवटच्या दिवसांबद्दल बोलण्यास सुरवात करतो.

to stir up your sincere mind

पेत्र त्याच्या वाचकांना या गोष्टींबद्दल विचार करण्यास भाग पाडण्याबद्दल बोलत आहे जसे की तो त्यांना झोपेतून उठवत आहे. पर्यायी भाषांतर: “तुम्ही शुद्ध विचार करावा यासाठी कारणीभूत होणे” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

2 Peter 3:2

the words spoken in the past by the holy prophets

हे कर्तरी स्वरुपात संगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “फार पूर्वी पवित्र संदेष्ट्याद्वारे बोलले गेलेले शब्द”(पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

the command of our Lord and Savior given through your apostles

हे कर्तरी स्वरुपात संगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “आपला प्रभू आणि तारणारा याची आज्ञा, जी तुमच्या प्रेषितांनी तुम्हाला दिली होती” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

2 Peter 3:3

Know this first

ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे हे माहित असू द्या. तुम्ही याचे भाषांतर 2 पेत्र 1:20मध्ये कसे केले आहे ते पहा.

proceed according to their own desires

येथे “इच्छा” या शब्दाचा संदर्भ पापमय इछा जी देवाच्या इच्छेला विरोध करते त्याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “त्यांच्या स्वतःच्या पापी इछेच्या अनुसार जीवन जगतील” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-explicit)

proceed

कृती, वागणूक

2 Peter 3:4

Where is the promise of his return?

थट्टा करणारे, हा अलंकारिक प्रश्न येशू परत येईल याच्यावर ते विश्वास ठेवीत नाहीत यावर भर देण्यासाठी विचारतात. “वचन” या शब्दाचा संदर्भ येशू परत येईल या वचनाच्या पुर्णतेशी येतो. पर्यायी भाषांतर: “येशू परत येणार हे वचन खरे नाही! तो परत येणार नाही!” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-rquestion आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metonymy)

our fathers fell asleep

येथे “वडील” यांचा संदर्भ पूर्वज जे फार वर्षापूर्वी जिवंत होते त्यांच्याशी येतो. झोपले ह्या शब्दाला मरणासाठीच सौम्य शब्दात सांगीतले आहे. पर्यायी भाषांतर: “आपले पूर्वज मेले” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-euphemism)

all things have stayed the same, since the beginning of creation

थट्टा करणारे “सर्व” या शब्दासह अतिशयोक्ती करतात, आणि आतापर्यंत या जगात काहीही बदलले नाही, आणि येशू परत येणार हे सत्य असू शकत नाही असा वाद घालतात. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-hyperbole)

since the beginning of creation

याचे भाषांतर मौखिक वाक्यांश असे केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने जगाची निर्मिती केल्यापासून” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-abstractnouns)

2 Peter 3:5

the heavens and the earth came to exist ... long ago, by God's command

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने स्वर्ग आणि पृथ्वी यांची स्थापना ... खूप आधी त्याच्या शब्दाद्वारे केली” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

came to exist out of water and through water

याचा अर्थ असा होतो की, देवाने पाण्यातून भूमीला बाहेर येण्यास भाग पाडले, पाण्याच्या स्रोतांना एकत्रित आणून भूमी प्रकट केली.

2 Peter 3:6

through these things

येथे “या गोष्टी” याचा संदर्भ देवाचे शब्द आणि पाणी याच्याशी येतो.

the world of that time was destroyed, being flooded with water

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने त्या वेळी अस्तित्वात असलेल्या जगाला पाण्याचा पूर आणून नाश केले” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

2 Peter 3:7

the heavens and the earth are reserved for fire by that same command

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: देवाने, त्याच शब्दाद्वारे, स्वर्ग आणि पृथ्वी यांना आगीसाठी राखून ठेवले आहे” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

that same command

येथे “आज्ञा” देव आहे, जो आज्ञा देईल: येथे “देव, जो समान आज्ञा देईल”

They are reserved for the day of judgment

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते आणि नवीन वाक्याची सुरवात केली जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “त्याने त्यांना न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवले” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

for the day of judgment and the destruction of the ungodly people

हे मौखिक वाक्यांशासह सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “अशा दिवसासाठी जेंव्हा तो अधर्मिक लोकांचा न्याय आणि नाश करील” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-abstractnouns)

2 Peter 3:8

It should not escape your notice

तुम्ही हे समजून घेण्यास चुकू नका किंवा “याच्याकडे दुर्लक्ष करू नका”

that one day with the Lord is like a thousand years

हेच की देवाच्या नजरेमध्ये, एक दिवस हजार वर्षांसारखा आहे

2 Peter 3:9

The Lord does not move slowly concerning his promises

देव त्याचे वचन पूर्ण करण्यास विलंब करणार नाही

as some consider slowness to be

काही लोक असा विचार करतात की, देव त्याचे वचन पूर्ण करण्यात सावकाश आहे कारण वेळेचा त्यांचा दृष्टीकोन हा देवाच्या दृष्टीकोनापेक्षा वेगळा आहे.

2 Peter 3:10

However

जरी देव सहनशील असला आणि लोकांनी पश्चात्ताप करावा अशी त्याची इच्छा असली, तरी तो खात्रीने परत येईल आणि न्याय करेल.

the day of the Lord will come as a thief

पेत्र त्या दिवसाबद्दल बोलत आहे जेंव्हा देव प्रत्येकाचा न्याय करेल जसे की तो दिवस चोर आहे जो अनपेक्षितपणे येतो आणि लोकांना आश्चर्यचकित करून जातो. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-personification आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-simile)

The heavens will pass away

आकाश नष्ट होईल

The elements will be burned with fire

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव सृष्टीतत्वे आगीने जाळून टाकील” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

The elements

शक्य अर्थ हे आहेत 1) आकाशातील अस्तित्वे जसे की सूर्य, चंद्र, आणि तारे किंवा 2) अशा गोष्टी ज्यांनी मिळून आकाश आणि पृथ्वी बनते, जसे की, माती, हवा, अग्नी, आणि पाणी.

the earth and the deeds in it will be revealed

देव सर्व पृथ्वीला आणि प्रत्येकाच्या कृत्यांना बघेल, आणि नंतर तो प्रत्येकाचा न्याय करेल. हे कर्तरी संज्ञात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव पृथ्वी आणि तिच्यावरील लोक जे काही करतात ते सर्व उघड करील” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

2 Peter 3:11

Connecting Statement:

पेत्र विश्वासणाऱ्यांना सांगण्यास सुरवात करतो की, त्यांनी प्रभूच्या दिवसाची वाट बघत कसे जीवन जगले पाहिजे.

Since all these things will be destroyed in this way

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कारण देव या सर्व गोष्टी याप्रकारे नष्ट करील” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

what kind of people should you be?

पेत्र या अलंकारिक प्रश्नाचा वापर तो पुढे जे सांगणार आहे त्यावर भर देण्यासाठी करतो, की, त्यांनी “पवित्र आणि दैवी जीवन जगले पाहिजे.” पर्यायी भाषांतर: “तुम्ही कोणत्या प्रकारचे लोक असले पाहिजे हे तुम्हाला माहित आहे” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-rquestion)

2 Peter 3:12

the heavens will be destroyed by fire, and the elements will be melted in great heat

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव आकाश अग्नीद्वारे नष्ट करील, आणि तो सृष्टीतत्वे अतिशय तापवून वितळवील” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

the elements

शक्य अर्थ हे आहेत 1) आकाशातील अस्तित्वे जसे की सूर्य, चंद्र, आणि तारे किंवा 2) अशा गोष्टी ज्यांनी मिळून आकाश आणि पृथ्वी बनते, जसे की, माती, हवा, अग्नी, आणि पाणी. तुम्ही याचे भाषांतर 2 पेत्र 3:10 मध्ये कसे केले आहे ते पहा.

2 Peter 3:13

where righteousness will dwell

पेत्र “धार्मिकता” याबद्दल बोलतो जसे की ती एक व्यक्ती आहे. हे अशा लोकांच्यासाठी लक्षणा आहे जे धार्मिक आहेत. पर्यायी भाषांतर: “जेथे धार्मिक लोक राहतील” किंवा “जेथे लोक धार्मिकतेने राहतील” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-personification)

2 Peter 3:14

do your best to be found spotless and blameless before him, in peace

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: तुम्ही जेथे देव तुम्हाला दोषरहित आणि निष्कलंक असे पाहील, आणि त्याच्याबरोबर आणि एकमेकांबरोबर शांतीने राहाल अशा प्रकारे जीवन जगण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करा” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

spotless and blameless

“निष्कलंक” आणि “निर्दोष” या शब्दांचा मूळ अर्थ एकच होतो आणि ते नैतिक शुद्धतेवर भर देतात. पर्यायी भाषांतर: “पूर्णपणे शुद्ध” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-doublet)

spotless

येथे याचा अर्थ “निर्दोष” असा होतो. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

2 Peter 3:15

consider the patience of our Lord to be salvation

कारण देव सहनशील आहे म्हणून न्यायाचा दिवस अजूनपर्यंत आला नाही. हे लोकांना पश्चात्ताप करून वाचावयाची संधी देते, जसे त्याने 2 पेत्र 3:9 मध्ये स्पष्ट केले. पर्यायी भाषांतर: “आणि, आमच्या प्रभूच्या सहनशीलतेबद्दल सुद्धा विचार करा जो तुम्हाला पश्चात्ताप करून वाचण्याची संधी देत आहे” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-explicit)

according to the wisdom that was given to him

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने त्याला दिलेल्या ज्ञानानुसार” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

2 Peter 3:16

Paul speaks of these things in all his letters

पौल त्याच्या सर्व पत्रात देवाची सहनशीलता तारनाकडे नेते याबद्दल बोलतो

in which there are things that are difficult to understand

पौलाच्या पत्रात काही गोष्टी आहेत ज्यांना समजणे अवघड आहे.

Ignorant and unstable men distort these things

अज्ञानी आणि अस्थिर मनुष्य पौलाच्या पत्रातील समजण्यास अवघड गोष्टींचा चुकीचा अर्थ लावतो.

Ignorant and unstable

अज्ञानी आणि अस्थिर. या लोकांना वचनांचा अर्थ योग्य रीतीने लावण्यास शिकवलेले नाही आणि त्यांना शुभवर्तमानाच्या सत्यात योग्य रीतीने स्थिरावलेले सुद्धा नाही.

to their own destruction

याचा परिणाम त्यांचा स्वतःचा नाश असा होतो

2 Peter 3:17

Connecting Statement:

पेत्र विश्वासणाऱ्यांना सूचना देणे थांबवतो आणि त्याच्या पत्राचा शेवट करतो.

since you know about these things

या गोष्टी याचा संदर्भ देवाच्या सहनशीलतेबद्दलचे सत्य आणि या खोट्या संदेष्ट्यांचे शिक्षण याच्याशी येतो.

guard yourselves

स्वतःचे रक्षण करा

so that you are not led astray by the deceit of lawless people

येथे “भलतीकडे नेणे” हे खोट्या गोष्टींबद्दलची खात्री पटवणे यासाठी रूपक आहे. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जेणेकरून त्या खोट्या लोकांनी तुम्हाला फसवू नये आणि तुम्ही चुकीचे काही करण्यास तुम्हाला भाग पाडू नये” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

you lose your own faithfulness

विश्वासाबद्दल बोलले आहे जसे की तो एक मालमत्ता आहे ज्याला विश्वासणारा गमावू शकतो. पर्यायी भाषांतर: “तुम्ही विश्वासू असणे थांबवणे” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

2 Peter 3:18

grow in the grace and knowledge of our Lord and Savior Jesus Christ

येथे त्याच्या दयेत आणि ज्ञानात वाढत जाणे हे त्याच्या दयेचा अधिकाधिक अनुभव करणे आणि त्याला अधिकाधिक ओळखणे याला सूचित करते. अमूर्त संज्ञा “दया” याला “दयेने वागा” या वाक्यांशासह व्यक्त केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “आपला प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त याची दया अधिकाधिक प्राप्त करा आणि त्याला अधिकाधिक ओळखा” किंवा “तुमच्याशी आपला प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्त कसा दयेने वागला याबद्दल जागरूक असा आणि त्याला अधिक चांगल्या प्रकारे जाणा” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-abstractnouns)