मराठी (Marathi): translationNotes Print

Updated ? hours ago # views See on WACS

3 योहानचा परिचय

भाग 1: सामान्य परिचय

3 योहानच्या पुस्तकाची रूपरेषा

1.a परिचय (1:1) . आदरातिथ्य दाखवण्या विषयीच्या सूचना आणि प्रोत्साहन (1:2-8)

  1. दियत्रेफस आणि देमेत्रिय (1:9-12)
  2. निष्कर्ष (1:13-14)

3 योहान हे पुस्तक कोणी लिहिले?

हे पत्र त्याच्या लेखकाचे नाव सांगत नाही. लेखक स्वतःची “वडील” म्हणून ओळख करून देतो (1:1). हे पत्र कदाचित प्रेषित योहानाकडून त्याच्या आयुष्याच्या शेवटी लिहिण्यात आले असावे.

योहानाने हे पत्र गायस नावाच्या एका विश्वासणाऱ्याला लिहिले. त्याने गायसला सूचना दिली की, जे त्याचे सहकारी विश्वासू त्याच्या भागातून प्रवास करतील त्यांचे आदरातिथ्य करणारा बन.

या पुस्तकाच्या शीर्षकाचे भाषांतर कसे केले जाऊ शकते?

भाषांतरकार या पुस्तकाला त्याच्या “3 योहान” किंवा “तिसरे योहान” या पारंपारिक नावाने संबोधण्याची निवड करू शकतात. किंवा ते स्पष्ट शीर्षकाची निवड करू शकतात, जसे की “योहानापासूनचे तिसरे पत्र” किंवा “योहानाने लिहिलेले तिसरे पत्र.” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#translate-names)

भाग 2: महत्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पना

आदरातिथ्य म्हणजे काय?

प्राचीनांमध्ये पश्चिमी भागाच्या जवळ आदरातिथ्य ही एक महत्वाची संकल्पना होती. परदेशी किंवा बाहेरच्या लोकांच्या बरोबर स्नेहपूर्ण रीतीने वागणे आणि गरज असल्यास त्यांना मदत करणे महत्वाचे होते. 2 योहानमध्ये, योहान ख्रिस्ती लोकांना खोट्या शिक्षकांचे आदरातिथ्य करण्यापासून परावृत्त करतो. 3 योहानमध्ये, योहान ख्रिस्ती लोकांना विश्वासू शिक्षकांचे आदरातिथ्य करण्यास प्रोत्साहित करतो.

भाग 3: महत्वाच्या भाषांतराच्या समस्या

या पत्रामध्ये लेखक कौटुंबिक नातेसंबंधांचा उपयोग कसा करतो?

लेखक “बंधू” आणि “मुले” या संज्ञांचा उपयोग ज्या प्रकारे करतो ते गोंधळात टाकणारे आहे. वचने “बंधुंनो” या संज्ञेचा उपयोग सहसा यहुद्यांना संदर्भित करण्यासाठी करतात. परंतु या पत्रामध्ये योहान त्याचा उपयोग ख्रिस्ती लोकांना संदर्भित करण्यासाठी करतो. तसेच योहान काही विश्वासू लोकांना “मुले” म्हणून संबोधतो. हे ते विश्वासू आहेत ज्यांना त्याने ख्रिस्ताचे अनुसरण करण्यास शिकवले.

योहान “परराष्ट्रीय” या संज्ञेचा सुद्धा उपयोग ज्या प्रकारे करतो, ते गोंधळात टाकणारे आहे. वचने “परराष्ट्रीय” या संज्ञेचा उपयोग सहसा यहुदी नसलेल्यांना संदर्भित करण्यासाठी करतात. परंतु या पत्रामध्ये योहान त्याचा उपयोग ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला नाही त्यांना संदर्भित करण्यासाठी करतो.

3 John 1

3 John 1:1

General Information:

हे योहानाचे गायस याला वैयक्तिक पत्र आहे. “तु” आणि “तुझ्या” या सर्व घटना गायस याला संदर्भित करतात आणि ते एकवचनी आहे> (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-you)

The elder

हे योहानाला संदर्भित करते, येशूचा शिष्य आणि प्रेषित. तो स्वतःला “वडील” म्हणून संबोधतो कारण एकतर त्याचे वय झाले असावे म्हणून किंवा तो मंडळीचा पुढारी असावा म्हणून. लेखकाचे नाव स्पष्ट केले जाऊ शकते: “मी, योहान एक वडील, लिहित आहे.” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-explicit)

Gaius

हा एक सहकारी अनुयायी आहे ज्याला उद्देशून योहान पत्र लिहित आहे. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#translate-names)

whom I love in truth

ज्यावर मी खरोखर प्रेम करतो

3 John 1:2

all may go well with you and that you may be healthy

तु सर्व गोष्टींमध्ये चांगले करावे आणि निरोगी रहावेस

just as it is well with your soul

जसे तु अत्मिकदृष्ट्या चांगले करत आहेस

3 John 1:3

brothers came

सहकारी विश्वासू लोक आले. हे सर्व लोक कदाचित पुरुष असावेत.

you walk in truth

मार्गावरून चालणे हे एखादा मनुष्य कसे जीवन जगतो त्यासाठीचे रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “तु तुझे जीवन देवाच्या सत्याशी सुसंगत असे जगत आहेस” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

3 John 1:4

my children

योहान अशा लोकांबद्दल बोलत आहे ज्यांना त्याने येशुंवर विश्वास ठेवायला शिकवले, जणू ते त्याची मुलेच होती. हे त्याचे त्यांच्याबद्दल असलेल्या प्रेमावर आणि काळजीवर भर देते. हे असेही असू शकते की त्याने स्वतः त्यांना देवाकडे आणले असावे. पर्यायी भाषांतर: “माझी आत्मिक मुले” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

3 John 1:5

General Information:

येथे “आपण” या शब्दाचा संदर्भ योहान आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांशी येतो, आणि त्यामध्ये सर्व विश्वासू लोकांचा समावेश देखील शक्य आहे. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-inclusive)

Connecting Statement:

योहानाचा हे पत्र लिहिण्यामागचा हेतू गायस ज्या प्रकारे प्रवासी पवित्रशास्त्राच्या शिक्षकांची काळजी घेत होता त्याबद्दल त्याचे कौतुक करणे हा होता; नंतर तो दोन प्रकारच्या लोकांच्याबद्दल बोलतो, एक चांगले आणि दुसरे दुष्ट.

Beloved

येथे याला सहविश्वासूसाठी प्रेमळपणाचा शब्द म्हणून वापरले आहे.

you practice faithfulness

जे देवाशी विश्वासू आहे ते तु करत आहेस किंवा “तु देवाशी एकनिष्ठ आहेस”

work for the brothers and for strangers

सहविश्वासू लोकांना आणि ज्यांना तु ओळखत नाहीस त्यांना मदत कर

3 John 1:6

who have borne witness of your love in the presence of the church

हे शब्द “अनोळखी” लोकांचे वर्णन करतात (वचन 5). “अनोळखी ज्यांनी मंडळीमधील विश्वासणाऱ्या लोकांना तु त्यांच्यावर कसे प्रेम केले ते सांगितले”

You do well to send them

या विश्वास ठेवणाऱ्यांना मदत करण्याच्या सामान्य कृतीसाठी योहान गायसचे आभार मानत आहे.

3 John 1:7

because it was for the sake of the name that they went out

येथे “नाव” याचा संदर्भ येशुशी येतो. पर्यायी भाषांतर: “कारण ते लोकांना येशुबद्दल सांगण्यासाठी बाहेर गेले” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metonymy)

taking nothing

त्यांना काही भेट किंवा मदत मिळाली नाही

the Gentiles

येथे “परराष्ट्रीय” याचा अर्थ फक्त असे लोक जे यहुदी नाहीत असा होत नाही. हे अशा लोकांना सूचित करते जे येशूवर विश्वास ठेवत नाहीत.

3 John 1:8

so that we will be fellow workers for the truth

म्हणून आपण त्यांना सहकार्य करू जेणेकरून ते लोकांना देवाच्या सत्याची घोषणा करतील.

3 John 1:9

General Information:

“आम्ही” हा शब्द योहान आणि जे त्याच्याबरोबर होते त्यांना संदर्भित करतो आणि तो गायसला समाविष्ट करत नाही. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-exclusive)

congregation

याचा संदर्भ गायस आणि विश्वासणाऱ्यांचा समूह जे देवाची उपासना करण्यासाठी एकत्र येतात त्यांच्याशी येतो.

Diotrephes

तो मंडळीचा सभासद होता. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#translate-names)

who loves to be first among them

ज्याला तुमच्यामधील महत्वाचा एक असे होण्याची इच्छा आहे किंवा “ज्याला असे वागणे आवडते, जणू तो त्यांचा पुढारी आहे”

3 John 1:10

talking wicked nonsense against us

आणि कसा तो आमच्याबद्दल वाईट गोष्टी सांगतो ज्या खात्रीने खऱ्या नाहीत

refused to welcome the brothers

सहविश्वासणाऱ्यांचे स्वागत करत नाही

stops those who want to welcome them

ज्यांची विश्वासणाऱ्यांचे स्वागत करण्याची इच्छा आहे त्यांना तो थांबवतो

puts them out of the church

तो त्यांना मंडळी सोडण्यास भाग पाडतो

3 John 1:11

Beloved

येथे याला सहविश्वासूसाठी प्रेमळपणाचा शब्द म्हणून वापरले आहे. तुम्ही याचे भाषांतर 3 योहान 1:5 मध्ये कसे केले आहे ते पहा.

do not imitate what is evil

लोक ज्या वाईट गोष्टी करतात त्यांचे अनुकरण करू नको

but what is good

तेथे शब्द बाकी आहेत पण त्यांना समजले गेले आहे. पर्यायी भाषांतर: “परंतु ज्या चांगल्या गोष्टी लोक करतात त्यांचे अनुकरण कर” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-ellipsis)

is of God

ते देवाचे आहेत

has not seen God

देवाचे नाहीत किंवा “देवावर विश्वास ठेवत नाहीत”

3 John 1:12

General Information:

येथे “आम्ही” हा शब्द योहान आणि जे त्याच्याबरोबर होते त्यांना संदर्भित करतो आणि तो गायसला समाविष्ट करत नाही. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-exclusive)

Demetrius is borne witness to by all

हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जो कोणी देमेत्रियसला ओळखतो तो त्याची साक्ष देतो” किंवा “प्रत्येक विश्वासी जो देमेत्रियसला ओळखतो तो त्याच्याबद्दल चांगले बोलतो” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-activepassive)

Demetrius

कदाचित हा तो मनुष्य असेल ज्याचे जेंव्हा तो भेट देण्यास येईल तेंव्हा गायस आणि मंडळीने स्वागत करावे अशी योहानाची इच्छा असेल. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#translate-names)

by the truth itself

सत्य स्वतःच त्याच्याबद्दल चांगले सांगेल. येथे “सत्य” या शब्दाचे वर्णन एखादा मनुष्य बोलत आहे असे केले आहे. पर्यायी भाषांतर: “प्रत्येकजण ज्याला सत्य माहित आहे त्याला तो चांगला मनुष्य आहे हे माहित आहे” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-personification आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-explicit आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-rpronouns)

We also bear witness

योहान ज्याची पुष्ठी करत आहे ते सूचित केले गेले आणि ते येथे स्पष्ट केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “आम्हीसुद्धा देमेत्रियसबद्दल चांगले बोलतो” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-ellipsis)

3 John 1:13

General Information:

हा योहानाने गायसला लिहिलेल्या पात्राचा शेवट आहे. तो काही शेवटच्या सूचना देत आणि अभिवादन करून पात्राचा शेवट करतो.

I do not wish to write them to you with pen and ink

या इतर गोष्टी लिहिण्याची योहानाची अजिबात इच्छा नाही. तो असे म्हणत नाही की त्या गोष्टी तो पेन आणि शाही यांच्या व्यतिरिक्त इतर कशानेतरी लिहील.

3 John 1:14

face to face

येथे समोरासमोर ही एक अतिशयोक्ती आहे, ज्याचा अर्थ “वैयक्तिकरित्या.” पर्यायी भाषांतर: “वैयक्तिकरित्या” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-idiom)

3 John 1:15

May peace be with you

देव तुम्हाला शांती देओ

The friends greet you

येथले मित्र तुम्हाला अभिवादन करतात

Greet our friends there by name

तेथील प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला माझा सलाम सांगा