मराठी (Marathi): translationNotes Print

Updated ? hours ago # views See on WACS

2 योहानाचा परिचय

भाग 1: सामान्य परिचय

2 योहानाच्या पुस्तकाची रूपरेषा

  1. अभिवादन (1:1-3)
  2. प्रोत्साहन आणि महान आज्ञा (1:4-6)
  3. खोट्या शिक्षकांबद्दल चेतावणी (1:7-11)
  4. सहविश्वासणाऱ्यांकडून सलाम (1:12-13)

2 योहान हे पुस्तक कोणी लिहिले?

हे पत्र त्याच्या लेखकाचे नाव सांगत नाही. लेखक स्वतःची ओळख “वडील” म्हणून करून देतो. हे पत्र कदाचित प्रेषित योहानाकडून त्याच्या आयुष्याच्या शेवटी लिहिण्यात आले असावे. 2 योहानमधील मजकूर हा योहानकृत शुभवर्तमान या पुस्तकाच्या मजकुरासारखा आहे.

2 योहान हे पुस्तक कशाबद्दल आहे?

योहान या पत्रात तो “निवडलेली स्त्री” आणि “तिची मुले” या नावाने बोलावत असलेल्या कोण एकाला संबोधित करत आहे (1:1). हे कदाचित एखाद्या विशेष मैत्रिणीला आणि तिच्या मुलांना संदर्भित करत असेल. किंवा हे एखाद्या विश्वासणाऱ्यांच्या समूहाला किंवा सामान्यपणे विश्वासणाऱ्यांना संदर्भित करत असेल. हे पत्र लिहिण्यामागे योहानाचा हेतू त्याच्या श्रोत्यांना खोट्या शिक्षकांच्याबद्दल चेतावणी देणे हा होता. विश्वासणाऱ्यांनी खोट्या शिक्षकांना मदत किंवा पैसे देऊ नये असे योहानाला वाटत होते. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

या पुस्तकाच्या शीर्षकाचे भाषांतर कसे केले जाऊ शकते?

भाषांतरकार या पुस्तकाला त्याच्या “2 योहान” किंवा “दुसरे योहान” या पारंपारिक नावाने संबोधण्याची निवड करू शकतात. किंवा ते स्पष्ट शीर्षकाची निवड करू शकतात, जसे की “योहानापासूनचे दुसरे पत्र” किंवा “योहानाने लिहिलेले दुसरे पत्र.” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#translate-names)

भाग 2: महत्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक संकल्पना

आदरातिथ्य म्हणजे काय?

प्राचीनांमध्ये पश्चिमी भागाच्या जवळ आदरातिथ्य ही एक महत्वाची संकल्पना होती. परदेशी किंवा बाहेरच्या लोकांच्या बरोबर स्नेहपूर्ण रीतीने वागणे आणि गरज असल्यास त्यांना मदत करणे महत्वाचे होते. विश्वासणाऱ्यांनी पाहुण्यांचे आदरतिथ्य करावे अशी योहानाची इच्छा होती, तथापि त्यांनी खोट्या शिक्षकांचे आदरातिथ्य करू नये असे त्याला वाटत होते.

योहान ज्यांच्या विरुद्ध बोलला ते लोक कोण होते?

ज्या लोकांच्या विरुद्ध योहान बोलला ते कदाचित अज्ञातवासी म्हणून ओळखले गेले असावे. या लोकांनी विश्वास ठेवला की भौतिक जग दुष्ट आहे. म्हणून त्यांनी विश्वास ठेवला की येशू दैवी होता, त्यांनी तो खरोखर मनुष्य होता हे नाकारले. याचे कारण त्यांना असे वाटले की देव मनुष्य बनणार नाही, कारण भौतिक शरीर हे दुष्ट आहे. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tw/kt.html#evil)

2 John 1

2 John 1:1

General Information:

परंपरा प्रेषित योहानाला या पत्राचा लेखक म्हणून ओळख करून देते. बहुदा जरी एखाद्या वैयक्तिक स्त्रीला लिहिले असले, तरी तो लिहितो की, त्यांनी “एकमेकांवर प्रेम करायला हवे” हे कदाचित मंडळीला असावे. या पत्रामधील “तुम्ही” आणि “तुमच्या” या सर्व घटना बहुवचन आहेत, जोपर्यंत अन्यथा म्हणून नमूद केले जात नाही. या पत्रात योहान त्याचा आणि त्याच्या वाचकांचा समावेश “आपण” आणि “आपले” म्हणून करतो. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-you आणि https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-inclusive)

From the elder to the chosen lady and her children

या प्रकारे पत्राची सुरुवात झाली. लेखकाचे नाव स्पष्ट केले गेले. पर्यायी भाषांतर: “मी, योहान जो वडील, हे पत्र निवडेल्या स्त्रीला आणि तिच्या मुलांना लिहित आहे” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-explicit)

the elder

हे योहान, येशूचा प्रेषित आणि शिष्य याला संदर्भित करते. तो स्वतःला “वडील” म्हणून एकतर त्याच्या वयामुळे किंवा तो मंडळीचा पुढारी असल्यामुळे संबोधित करतो.

to the chosen lady and her children

हे कदाचित मंडळीला आणि तिच्या विश्वासणाऱ्यांना संदर्भित करते. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

2 John 1:3

Father ... Son

ही महत्वाची शीर्षके आहेत जी देव आणि येशू यांच्या मधील संबंधांचे वर्णन करतात. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#guidelines-sonofgodprinciples)

in truth and love

“सत्य” हा शब्द “प्रेम” याचे वर्णन करतो. शक्यतो याचा अर्थ “खऱ्या प्रेमात.” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-hendiadys)

2 John 1:4

your children

“तुझा” हा शब्द एकवचनी आहे. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-you)

just as we have received this commandment from the Father

जशी देव जो पिता याने आपल्याला आज्ञा दिली

2 John 1:5

you, lady ... writing to you

“तु” या शब्दाच्या या घटना एकवचनी आहेत. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-you)

not as though I were writing to you a new commandment

असे नाही की, मी तुम्हाला काही नवीन करण्याची आज्ञा देत आहे

but one that we have had from the beginning

येथे, “सुरवात” याचा संदर्भ “जेंव्हा पहिल्यांदा विश्वास ठेवला” याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “परंतु मी तुम्हाला लिहित आहे जे ख्रिस्ताने आम्हाला करायला सांगितले जेंव्हा आम्ही पहिल्यांदा विश्वास ठेवला. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-explicit)

beginning—that we should love one another

हे नवीन वाक्य म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “सुरवातीला. त्याने आज्ञा दिली की, आम्ही एकमेकांवर प्रेम केले पाहिजे”

2 John 1:6

This is the commandment, just as you heard from the beginning, that you should walk in it

देवाच्या आज्ञेनुसार आपले जीवन जगणे हे सांगण्यासाठी जसे की आम्ही त्याच्यामध्ये चालत होतो असे बोलले आहे. “ते” या शब्दाचा संदर्भ प्रेमाशी येतो. “आणि त्याने तुम्हाला आज्ञा दिली आहे, ज्याअर्थी तुम्ही पहिल्यांदा विश्वास ठेवला, तेंव्हा एकमेकांवर प्रीती करा” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)

2 John 1:7

Connecting Statement:

योहान त्यांना फसवणाऱ्यांविषयी चेतावणी देतो, आणि ख्रिस्ताच्या शिकवणुकीत राहण्याची आठवण करून देतो, आणि जे ख्रिस्ताच्या शिकवणुकीत राहत नाहीत त्यांच्यापासून दूर राहण्याची चेतावणी देतो.

For many deceivers have gone out into the world

कारण अनेक खोट्या शिक्षकांनी सभा सोडली आहे किंवा “कारण अनेक फसवणारे जगात आहेत”

many deceivers

अनेक खोटे शिक्षक किंवा “अनेक भोंदू”

Jesus Christ came in the flesh

शरीरात येणे हे खरा मनुष्य बनणे यासाठी रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “येशू ख्रिस्त खरा मनुष्य बनून आला” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metonymy)

This is the deceiver and the antichrist

ते असे लोक आहेत जे इतरांना फसवतात आणि स्वतः ख्रिस्ताचा विरोध करतात

2 John 1:8

Look to yourselves

पाहत राहा किंवा “लक्ष द्या”

lose the things

तुमच्या भविष्यातील स्वर्गातील प्रतीफळाला मुकाल

full reward

स्वर्गातील प्रतिफळ पूर्ण करा

2 John 1:9

Whoever goes on ahead

याचा संदर्भ अशा व्यक्तीशी येतो जो असा दावा करतो की त्याला देव आणि सत्य याबद्दल इतरांपेक्षा जास्त माहित आहे. पर्यायी भाषांतर: “जो कोणी दावा करतो की त्याला देवाबद्दल जास्त माहित आहे” किंवा “जो कोणी सत्याला मानीत नाही”

does not have God

तो देवापासून नाही

The one who remains in the teaching, this one has both the Father and the Son

असा कोणी जो ख्रिस्ताच्या शिक्षणाचे अनुसरण करतो तो पिता आणि पुत्र या दोघांचा आहे

the Father and the Son

ही महत्वाची शीर्षके आहेत जी देव आणि येशू यांच्या मधील संबंधांचे वर्णन करतात. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#guidelines-sonofgodprinciples)

2 John 1:10

receive him into your house

येथे याचा अर्थ त्याचे स्वागत करणे आणि त्याला सन्मानाने वागवणे जेणेकरून त्याच्याबरोबर संबंध वाढत जातील.

2 John 1:11

participates in his evil deeds

त्याच्या वाईट कृत्यांमध्ये भाग घेता किंवा “त्याच्या वाईट कृत्यांमध्ये मदत करता”

2 John 1:12

General Information:

12 व्या वाचनातील “तु” हा शब्द एकवचनी आहे. 13 व्या वाचनातील “तुमचे” हा शब्द अनेकवचनी आहे. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-you)

Connecting Statement:

योहानाचे पत्र त्याची त्यांना भेटण्याच्या इच्छेने आणि इतर मंडळीकडून सलाम देऊन संपते.

I did not wish to write them with paper and ink

योहानाला इतर गोष्टी लिहिण्याची अजिबात इच्छा नाही परंतु त्याला त्यांच्याकडे येऊन काही गोष्टी सांगायला आवडेल. तो असे म्हणत नाही की तो त्या गोष्टी कागद आणि शाही याव्यतिरिक्त कशानेतरी लिहील.

speak face to face

येथे समोरासमोर ही एक अतिशयोक्ती आहे, ज्याचा अर्थ त्यांच्या उपस्थितीमध्ये. पर्यायी भाषांतर: “तुमच्या उपस्थितीत बोलेन” किंवा “तुझ्याशी वैयक्तिक बोलेन” (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-idiom)

2 John 1:13

The children of your chosen sister

येथे योहान त्याच्या इतर मंडळीबद्दल बोलतो जसे की ती वाचकांच्या मंडळीची बहिण आहे आणि त्या जे विश्वासू त्या मंडळीचा भाग आहेत जसे की ते त्या मंडळीची मुले आहेत. सर्व विश्वासू हे एक आत्मिक कुटुंब आहे यावर हे भर देते. (पहा: https://read.bibletranslationtools.org/u/WA-Catalog/*_tm/translate.html#figs-metaphor)